BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
'लाडकी बहीण' योजनेतून जवळपास 80 लाख लाभार्थी अपात्र; गंभीर आरोपांसह विरोधकांनी केली 'अशी' टीका
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही योजना महायुती सरकारने जून 2024 पासून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केली होती.
'कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके 6 जूनला भारतात परतणार
'कॉक्रोच जनता पार्टी' या उपहासात्मक सोशल मीडिया मोहिमेचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी 6 जून रोजी भारतात परत येऊन शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर इथे शांततापूर्ण आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे.
'इथेच वाढलो, आई-वडील झालो, मुलांची लग्नं झाली, मात्र आता...' भारतातून बांगलादेशात जाणारे लोक काय म्हणत आहेत?
दररोज अनेकजण सीमा ओलांडून बांगलादेशात जाण्यासाठी सातक्षीरा आणि पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगण्याच्या सीमेलगतच्या भागात पोहोचत आहेत.
एअर इंडिया : अहमदाबाद विमान अपघातानंतर कंपनीवरचं संकट अधिक गडद झाल्याची 'अशी' आहे चर्चा
अलीकडच्या काळात घडलेल्या अनेक घटनांमुळे एअर इंडियाच्या सुरक्षितता आणि कामकाजाच्या कामगिरीबाबत देखील चिंता निर्माण झाली आहे.
आत्महत्या करणाऱ्यांमध्ये विवाहितांची संख्या का वाढते आहे? ताज्या आकडेवारीतून काय समोर आलं?
आत्महत्येच्या संदर्भात 2024 मध्ये नोंदवण्यात आलेल्या 1.70 लाखांहून अधिक प्रकरणांमध्ये एक-तृतियांशाहून अधिक प्रकरणांसाठी हेच कारण नोंदवण्यात आलं.
'ब्रेस्ट कॅन्सरच्या लाखो रुग्णांची किमोथेरपी टाळता येईल', नव्या संशोधनातून 'या' गोष्टी आल्या समोर
आंतरराष्ट्रीय अभ्यासात असं आढळून आले आहे की, दोन तृतीयांशपेक्षा जास्त रुग्णांना किमोथेरपीच्या दुष्परिणामांपासून वाचवता येऊ शकतं. त्यांच्यावर फक्त हार्मोन थेरपीने उपचार केले जाऊ शकतात.
मान्सूनवर सुपर एल निनोचा असा परिणाम होईल, इंडियन ओशन डायपोलमुळे दिलासा?
मान्सूनचा पाऊस बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतो. सध्या ज्याची सतत चर्चा होते आहे, ती गोष्ट म्हणजे ENSO, अर्थात एल निनो सदर्न ऑसिलेशन. (ऑसिलेशन म्हणजे हेलकावे.)
'शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये', मुख्यमंत्र्यांचं आवाहन; असा आहे राज्याच्या हवामानाचा अंदाज
राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.
जमिनीच्या वादातून सहा जणांची हत्या; पोलीस तपासात समोर आली दहावर्षांपूर्वीची 'ही' माहिती
पुढील तपास, फॉरेन्सिक अहवाल आणि साक्षीदारांच्या जबाबांनंतरच घटनेचं संपूर्ण चित्र स्पष्ट होऊ शकेल, असे पोलिसांनी सांगितले.
शॉर्ट व्हीडिओ
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, Video : मनोज जरांगे भर उन्हात बसले उपोषणाला, सरकारच्या आश्वासनावर त्यांनी केलं 'हे' आवाहन , वेळ 2,20
मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटी याठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी भर ऊन्हात आंदोलन सुरू केलं आहे.
व्हीडिओ, वेदांत श्रीवास्तवने 12 वीच्या गुणांवर प्रश्न उपस्थित केले; CBSE ने चूक मान्य केली, नेमकं प्रकरण काय?, वेळ 6,01
CBSE बोर्डाचा बारावीतला विद्यार्थी वेदांत श्रीवास्तवची फिजिक्सची उत्तरपत्रिका देशभरात चर्चेचा विषय ठरली.
व्हीडिओ, पुणे जिल्ह्यातील या भागात मुसळधार पाऊस पडतो, तरीही इथले गावकरी उन्हाळ्यात तहानलेले का?, वेळ 5,48
पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरच्या आदिवासी पट्ट्यात पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो. उन्हाळ्यात इथल्या गावकऱ्यांना आणि विशेषत: महिलांना दिवसभर दूरवरून पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागते.
व्हीडिओ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेसाठी रेड अलर्ट; कुठे मान्सूनपूर्व वादळी पाऊस?, वेळ 2,40
महाराष्ट्रासह मध्य भारताच्या काही भागांत आलेली उष्णतेची लाट पुढचे काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
व्हीडिओ, अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा कोणत्या देशाला फटका, कोणत्या देशांना फायदा? - सोपी गोष्ट, वेळ 4,47
जगात असं कुठलं चलन आहे का? जे या युद्धाच्या काळात मजबूत झालं? किंवा असं चलन ज्यांना फारसा फरक पडला नाही?
व्हीडिओ, रिझर्व्ह बँकेने आणलेला डिजिटल रुपया काय आहे आणि तो कसा वापरतात?, वेळ 3,44
E-रुपया काय आहे..तो UPI पेक्षा वेगळा कसा आणि क्रिप्टो करन्सी आणि डिजिटल करन्सी यात काय फरक आहे?
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणारे योद्धे' कुंवरसिंह : ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते
कुँवर सिंह घोडेस्वारीत अत्यंत निपुण होते आणि कितीही बेफाम असणाऱ्या घोड्याला काबूत करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता.
मुस्लिमांच्या भूमीत असा तयार झाला ज्यूंचा देश इस्रायल, इस्रायलच्या जन्माची रक्तरंजित कथा
जिथे कोणत्याच सीमा आखलेल्या नाहीत, तिथे बाहेरच्या जगातून लोक येत राहून कालांतराने एका धर्माच्या लोकांचा देश कसा तयार होऊ शकतो? इस्रायलच्या जन्माची कथा गुंतागुंतीची आहे.



































































